विठ्ठलवाडीत माजी सैनिकांकडून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा
विठ्ठलवाडी, ता. 28 फेब्रुवारी 2019: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसुन केलेल्या कारवाईचे स्वागत करून विठ्ठलवाडीतील माजी सैनिकांनी विठ्ठल रुक्माई मंदिरा समोर लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरुर) येथील माजी सैनिक, ग्रामसमीती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामस्थांनी एकमेकांना लाडू भरवून भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रघुनंदन गवारे, आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष किसन गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सैनिक परशुराम गवारे, गुलाबराव गवारे, बाळासाहेब गाडे, रा.स्व.संघाचे विभागीय संघचालक संभाजीआप्पा गवारे, माजी पोलीस पाटील चंद्रकांत गवारे, बबनराव गवारे, सांगवी सांडसचे माजी सरपंच संजय पाबळे, रायचंद शिंदे, बबन गवारे, महादेव गवारे, माजी उपसरपंच दिलीप गवारे, प्रकाश गवारे, संदिप गवारे, प्रविण गवारे, विश्वनाथ गवारे, चंद्रकांत गवारे आदी उपस्थित होते.