आढळराव-वळसे पाटील यांची दहा मिनिटे बंद खोलीत चर्चा

Image may contain: 2 people, people smiling, closeup
शिरूर, ता. 28 फेब्रुवारी 2019: शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे दोघांनी बंद खोलीत दहा मिनिटे बसले. यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आचंबित झाले असून, चर्चेला उधान आले आहे.

मुंबईत मंत्रालयामध्ये दोघांनी बंद खोलीत बसून चर्चा केली आहे. दोघांच्या चर्चेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघे बंद खोलीत असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र खोलीबाहेर बसले होते.

आढळराव व वळसे पाटील हे दोन्ही नेते एकमेकांचे जुने मित्र असून, राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत. एकमेकांकावर राजकीय टीका करत असले तरी ते एकमेकांना राजकारणात नेहमीच सांभाळून घेतात, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. दोघांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी बंद खोलीमध्ये काय चर्चा केली असावी? यावर नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या