शिरुर तालुक्यातील प्रशासकिय अधिका-यांच्या बदल्या

Image may contain: 3 people, people smiling, people standing and indoorशिरुर,ता.२८ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांची बदली झाल्याने तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजु झाले आहेत.

निवडणुकिपुर्वी व आचारसंहिता लागु होण्यापुर्वी अधिका-यांचे बदल्यांचे सञ सुरु असुन पुणे जिल्हयातही प्रशासकिय अधिका-यांच्या बदल्यांना वेग आला आहे.शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांची सातारा जिल्हयात वाई येथे बदली झाली आहे.त्यांच्या जागी शिरुर तहसिल कार्यालय येथे नवीन तहसिलदार म्हणुन गुरु बिराजदार हे रुजु झाले आहेत.पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे (दि.२८) रोजी सेवानिवृत्त होत आहे.त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणुन नारायण सारंगकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तहसिलदार रणजित भोसले यांनी शिरुर तहसिलदार कार्यालयात दिड वर्षांहुन अधिक काळ त्यांनी काम केले.त्यांच्या जागी गुरु बिराजदार यांची नेमणुक झाली असुन शिरुर तालुक्यात महसुलची डागाळलेली प्रतिमा, वाळुचोरी रोखण्याचे मोठे आव्हान बिराजदार यांच्यासमोर आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले कैलास घोडके यांची ३६ वर्षे सेवा व शिरुर पोलीस स्टेशनला आठ महिने कार्यकाळानंतर ते सेवानिवृत्त होत आहे.त्यांच्या जागी तत्काळ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर रुजु झाले आहेत.शांत व मितभाषी ओळख असलेले टाकळी हाजी बिटचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांची सोलापुर ग्रामीणला बदली झाली आहे.शिरुर पोलीस स्टेशनला या पुर्वी लेडी सिंघम म्हणुन अनिता होडगे यांनी चांगलाच दबदबा निर्माण केला होता.त्यानंतर त्यांच्या जागी घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांच्या रिक्त जागी अद्याप कोणीही हजर झाले नसले तरी अनिता होडगे यांच्या प्रमाणेच दबंग महिला पोलीस उपनिरीक्षकाची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या