करडेत फियाट कंपनीकडुन शाळेस शौचालय युनिट

Image may contain: 6 people, people standing and outdoorकरडे,ता.२ मार्च २०१९(प्रतिनीधी): करडे येथे फियाट कंपनीच्या माध्यमातुन जि.प.प्राथ.शाळेस शौचालय युनिट देण्यात आले.ग्रामस्थांच्या उपस्थितीत हस्तांतरण करण्यात आले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजयकुमार जगदाळे यांनी दिली.

या कार्यक्रमाला फियाट कंपनीचे समिर रेड्डी,सी.एस.आर प्रोजेक्ट मॅनेजर अमोल फटाले,भरत बांदल,नितीन वारे,सरपंच सुनिल इसवे,उपसरपंच गणेश रोडे,तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताञय देशमुख, ग्रा.प.सदस्य आप्पा वाळके,ग्रामसेवक राहुल बांदल,दादासो झिंजुर्के,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजयकुमार जगदाळे,उपाध्यक्ष  असिम तांबोळी,माजी उपसरपंच संतोष घायतडक,संजय जगदाळे,शेखलाल तांबोळी,सुरेश रोडे,राजेंद्र गायकवाड,सुजाता देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजयकुमार जगदाळे यांनी माहिती देताना सांगितले कि,फियाट कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर सुमारे ८ लाख रुपये किंमतीच्या शौचालय युनिट ची सीएसआर योजनेच्या माध्यमातुन उभारणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा प्रश्न सुटणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या