चासकमानचे पाणी शिरसगावला मिळणार का ?

Image may contain: one or more people, outdoor and natureशिरसगाव काटा,ता.२ मार्च २०१९(प्रतिनीधी) : चासमकमान पाणी वाटपात शिरसगाव काट्यावर वारंवार अन्याय होत असुन चालु आवर्तनाचे पाणी शिरसगावला मिळणार का असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

चासकमान कालव्याच्या सर्वात शेवटच्या टोकाला शिरसगाव काटा हे गाव आहे.यापुर्वी सोडलेल्या अनेक आवर्तनानंतरही शिरसगाव काट्याला पाणी वाटपात वारंवार डावलले जात असुन पाणी मिळु शकलेले नाही.दुष्काळाची दाहकता वाढत असुन या कालव्यावर अवलंबुन असलेले बोअरवेल,विहिरी,कोरड्या पडलेल्या आहेत.हजारो रुपये खर्चुन बोअरवेल घेउन ही पाण्याचा थेंब लागत नाही.यामुळे शेतकरी चिंतेत आहे.गेल्या अनेक वर्षात शिरसगाव परिसरात पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांनी चा-या बुजवल्या आहेत.

निर्वी,कोळगाव डोळस या गावांनाही पाण्याची टंचाई जाणवु लागली असुन ग्रामस्थांनी चासकमान कालव्यातुन पिण्यासाठी तरी पाणी सोडा अशी मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या