शिरुर शहराला पाणीटंचाईचे सावट गडद

Image may contain: cloud, sky and outdoorशिरुर,ता.३ मार्च २०१९(अभिजित आंबेकर) : शिरुर शहराला पाणीपुरवठा (दि.२) पासुन दोन दिवसाआड़ सुरु झाल्याचे शिरुर नगरपरिषदेने जाहिर केले आहे.त्यामुळे शिरुरकरांना भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असुन शहराला काही वर्षानंतर एवढ्या मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असुन गेल्या काही वर्षात प्रथमच दोन दिवसाआड़ पाणी शिरुरकरांना अनुभवयास मिळत आहे.दरम्यान कुकडी प्रकल्पातुन पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

गेल्या महिन्यापासुन एकदिवसाआड़ पाणीपुरवठा होत होता माञ शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापुर पद्धतीचा बंधा-यात चार-पाच दिवस पुरेल एवढा पाणीसाठा राहिल्याने शिरुर नगरपरिषदेच्या वतीने दोनदिवसाआड़ पाणीपुरवठा करण्याचा  निर्णय घेन्यात आला आहे.या संदर्भात नुकतीच जलसंपदा राज्यमंञी विजय शिवतारे यांची नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समवेत भेट घेउन कुकडी प्रकल्पातुन बंधा-यात पाणी सोडावा अशी मागणी केली होती.

शिरुर शहराला प्रथमच एवढ्या मोठ्या पाणी टंचाईला तसेच दुष्काळाला तोंड देताना अवघड परिस्थिती निर्माण झाली असुन अजुन उन्हाळ्याचे चार महिने शिल्लक असताना शिरुर करांना पाणी कसेमिळणार याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.दरम्यान (दि.२) रोजी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद व प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असुन यात शिरुर नगरपरिषद शहराला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ असल्यामुळे पाणीपट्टी रद्द करुन शहराला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,शिरुर शहराची सध्याची लोकसंख्या ५० हजारांच्या वर असुन शिरुर शहराच्या बाजुने जाणा-या  घोडनदीवर शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापुर पद्धतीचा बंधारा हा १९९७-९८ च्या काळात युतीशासनाच्या काळात बांधला गेला आहे.त्यावेळी शहराची लोकसंख्या २० हजारांहुन कमी होती.वाढलेल्या लोकसंख्येच्या मानाने पाणी साठवण्याची क्षमता शिरुर नगरपरिषदेने वाढवणे गरजेचे होते.माञ पालिकेचे ढिसाळ नियोजन शुन्य,अकार्यक्षम कारभारामुळे शहराला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.शहरात पाणी टंचाई असताना नगरपरिषद पाणी पुरवठा करण्याऐवजी पाणीपट्टी वसुली मोहिम जोरदार राबवत आहे.नागरिकांना पाणी पुरवणे हि नगरपरिषदेची जबाबदारी असुन मुलभुत सुविधा नगरपरिषद पुरवु शकत  नसल्याने नगरपरिषदेने पाणीपट्टी व त्यावरील दंड व्याज घेउ नये अशी मागणी या निवेदनात केली आहे.

शिरुर शहर पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या याञेला तालुक्यातुन नव्हे तर राज्यभरातुन नागरिक येत असतात, माञ पाणीटंचाई मुळे प्रथमच नागरिकांना विकत  पाणी घेण्याची वेळ आली असुन सत्ताधारी वर्गाच्या जवळच्या असणा-यांचे शुद्धिकरण यंञणा,कुपनलिका यांचे साठे आहेत.ते शासनाने त्वरीत ताब्यात घ्यावे व शहरात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या