अभिनय हा नाट्य परिषदेचा आत्मा- सुर्यकांत पलांडे

शिरुर,ता.३ मार्च २०१९(प्रतिनीधी) : अभिनय हा नाटयपरिषदेचा आत्मा असुन हि कला दिर्घकाळ जिवंत राहावी यासाठी नाट्य एकांकिका  स्पर्धा होणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी व्यक्त केले.

शिरुर येथे नगरपालिका कार्यालयात अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित प्र.के.अञे. राज्यस्तरीय राज्य नाट्य एकांकीका स्पर्धेचे उदघाटन तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांच्या हस्ते संपन्न झाले.पहिल्या दिवशी पहिल्या सञात नउ एंकाकीका सादर करण्यात आल्या.यांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

या उद्घाटनप्रसंगी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सचिन सावंत, मोमीन  कवठेकर,हनुमंत कुबडे,ग्राहक संघटनेचे धंनजय गायकवाड , यशस्वीनीच्या सचिव नम्रता गवारे,मनिषा कालेवार, वंदना पोतदार, रेखा कळमकर, नाट्य परिषदेच्या सदस्या सत्यभामा पांचगे,संतोष परदेशी,सुभाष कुरंदळे, गौतम चिकणे, नाट्यपरिषदेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके,उपाध्यक्ष चंद्रकांत धापटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन संजीव मांढरे यांनी केले.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी एंकाकीका घेण्यापाठीमागचा उद्देश सांगुन ग्रामीण भागात जास्त प्रमाणात नाट्य चळवळ रुजली पाहिजे. त्याकरता वारंवार कार्यक्रम घेण्याचा मनोदय व्यक्त केला. महाराष्ट शासनाचा सांस्कृतिक विभागातुन पुरस्कार मिळालेले मोमीन कवठेकर यांचा नाट्यपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या