अभिनेते विरुद्ध नेते अशी निवडणुक रंगणार का ?

Image may contain: 1 person, beard and closeupशिरुर,ता.३ मार्च २०१९(प्रतिनीधी) : अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात चर्चांना उधान आले असुन नेते विरुद्ध अभिनेते अशी लढत रंगणार का ? याबाबत जोरदार चर्चा होउ लागल्या आहेत.

संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग येथिल निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे देखील त्यांच्यासोबत होते, त्याच वेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे भाकीत केले जात होते.त्यानंतर  अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्याकडे तगडा उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काहि दिवसांपुर्वी सांगितलं होतं.राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या जास्त असली तरी प्रबळ उमेदवार कोण याचीच जास्त चर्चा होत असुन तगडा उमेदवार हे डॉ.अमोल कोल्हे असल्याचे बोललं जात आहे. राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

दरम्यान डॉ.अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह असुन शिरुर लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याचीच सर्वांना उत्सुकता लागुन आहे.भोसरीचे विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी केली असुन लांडे यांना उमेदवारी मिळणार का असा सवाल हि केला जात आहे.एकंदरीत अभिनेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिरुर लोकसभेची गणिते बदलणार असल्याचे आडाखे बांधले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या