...अन त्या धक्‍क्‍याने आईनेही सोडले प्राण

Image may contain: 2 people, eyeglassesआंधळगाव,ता.४ मार्च २०१९(प्रतिनीधी) : मुलाच्या निधनाच्या बातमीच्या धक्‍क्‍याने वयस्कर आईनेही प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना शिरूर तालुक्‍यातील आंधळगाव येथे घडली.

याबाबत सविस्तर असे कि, मूळ गाव आंधळगाव येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक वाल्मीकराव बबनराव काळे (वय 61) हे मुंबई येथे राहायला आहेत. त्यांची आई जानकूबाई बबनराव काळे (वय 95) या गेल्या आठ दिवसांपासून मावडी (ता. पुरंदर) येथील नातेवाइकांकडे राहत होत्या. गुरुवारी आईला भेटण्यासाठी म्हणून वाल्मीकराव काळे हे मावडी येथे आले होते, आईला भेटल्यानंतर ते परत आपल्या मूळगाव आंधळगावला आले. गुरुवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी शिरूर येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाइकांकडून आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने यामध्ये आईचा देखील मृत्यू झाला. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसमध्ये कार्यरत असताना काळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना पोलिस खात्याकडून गौरविण्यात आले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या