शिक्रापूरात मोटारमध्ये आढळला अनोळखी मृतदेह

Image may contain: one or more people
शिक्रापूर, ता. 8 मार्च 2019: मलठण फाटा येथे एका मोटार गॅरेजमध्ये पाच दिवसांपासून दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मोटारीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठणफाटा येथे रमेश जाधव यांचे मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्या ठिकाणी पाच दिवसांपासून एक मोटार (क्र. एम एच १२ डि ई ७९९३) दुरुस्तीसाठी लावण्यात आलेली होती. ५ मार्च रोजी सायंकाळी जाधव हे दुकान बंद करुन घरी गेले त्यावेळी या मोटारचे काम करणे सुरु असल्यामुळे त्यांनी मोटारचे दरवाजे लॉक न करता तसेच ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जाधव हे दुकानात आले असताना त्यांना दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मोटारच्या पाठीमागील शीटवर एक अनोळखी व्यक्ती बसलेला दिसला. त्यावेळी जाधव यांना तो आजारी असल्याचा अंदाज आल्यामुळे जाधव यांनी १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली तेव्हा रुग्णवाहिका व डॉक्टर आले असताना सदर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा मृत्यू घोषित केले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता सदर मयत पुरुषाचे वय अंदाजे ७० वर्षे, अंगाने सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, केस पांढरे, दाढी व मिशा देखील पांढऱ्या, नाक सरळ, गोल चेहरा असे आढळून आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी आजूबाजूला त्या व्यक्तीबाबत चौकशी केली. परंतु, काही माहिती मिळू शकली नसून सदर व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याबाबत रमेश शंकर जाधव (रा. राऊतवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, शिक्रापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. सदर व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ८८८८८२८२६१ व ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास शिक्रापूरचे पोलिस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या