ऊसतोड मजुराच्या पत्निशी एकाने केले अश्लिल चाळे

Image may contain: one or more peopleशिक्रापूर, ता. 8 मार्च 2019: ऊसतोज मजुराची पत्नी विहीरवर कपडे धूत असताना एखाने पैसे द्यायचे आहेत म्हणून अश्लिल चाळे केले. शिवाय, तक्रार दाखल होऊ नये म्हणून दबावही आणला. पण, महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन गाठून विनयभंगाची तक्रार दाखल केली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, बबन किसन भुजबळ (वय 62, रा. पिंपळे-जगताप, ता.शिरूर) यांच्या शेतात काम करणा-या एका ऊस मजुराची पत्नी शेतातीलच विहीरीवर कपडे धूत होती. यावेळी बबन भुजबळ हा तिथे गेला व शेतीत काम केल्याचे पैसे द्यायचे आहेत म्हणून अश्लिल चाळे करू लागला. यावेळी संबंधित महिलेने आरडाओरड केल्यावर भुजबळ याची पत्नी द्रोपदाबाई भुजबळ घटनास्थळी आली. त्यांनी संबंधित महिलेलाच शिवीगाळ करुन काठीने मारहाण करायला सुरवात केली. याबाबतीत संबंधित महिलेने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता आरोपी बबन भुजबळ व द्रोपदाबाई भुजबळ यांचेवर मारहाण, शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपी बबन भुजबळ याला बुधवारी (ता. 6) अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, संबंधित प्रकरण गावातच मिटविण्याचा गंभीर प्रकारही या निमित्ताने उघडकीस आला असून, पोलिस स्टेशनमध्येही याच मंडळींनी केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल व्हावा असा दबाव आणण्याचा प्रकार केल्याची माहिती तक्रारदार महिलेने दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या