कवठे येमाईत जैन साध्वींना माथेफिरुकडून मारहाण

No photo description available.कवठे येमाई,ता.९ मार्च २०१९(प्रतिनीधी) : कवठे येमाई येथुन प्रवास करणाऱ्या दोन जैन मुनींना एका माथेफिरू कडून जबर मारहान करण्यात आल्यांची निंदनीय घटना घडली असून, त्यांचा तिव्र निषेध करण्यात येत आहे.

या मारहानी मधे गणीवर्य सिद्धसेन विजयजी महाराज व मुनी भव्यघोष विजयजी महाराज यांना मोठया प्रमानात मारहान करण्यात आली असुन ते जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहीती अशी शिरूर येथुन निघालेले पाच जैन मुनी हे शिरूर भिमाशंकर रस्त्यांने जात होते. ते प्रवास करीत असताना मुंजाळवाडी (कवठे येमाई) येथे अर्जुन हिलाळ या माथेफिरुनी त्यांना मारहान केली.

त्या वेळी येथुन जाणारे सागर मुखेकर यांनी हे पहाताच साधुना मदत करीत मारहान करणारा माथेफिरू अर्जुन सदाशिव हिलाळ याला रोखण्यांचा प्रयत्न केला असता, त्यांलाही मारहान केली.

त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जैन मुनींना कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. ही घटना समजतात घटनास्थळी मोठया प्रमानात जैन बांधव जमले.शिरूर, मंचर येथुन मोठया प्रमानात जैन बांधवांनी गर्दी केली होती. शिरूर चे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन, लवकरच त्याला अटक करू असे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या