जागतिक महिलादिनी युवास्पंदन कडून महिलांचा गौरव

Image may contain: 16 people, people smiling, people standingशिरुर,ता.९ मार्च २०१९(प्रतिनीधी) :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवा स्पंदन या समाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने शिरूर शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या मध्ये शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी ऍलिस पोरे, शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती करणाऱ्या तसेच आपल्या हॉस्पिटल मध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीला मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ.अर्चना आंधळे पाटील , अनेक गरजू लोकांना व महिलांना अगदी मोफत कायदेविषयक सहाय्य करणाऱ्या अॅड.अमृता खेडकर आणि अॅड.सीमा काशीकर,  वीटभट्टी कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण व अन्न पुरवणाऱ्या तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या राणी कर्डिले, आकांक्षा एज्युकेशन फाऊंडेशन च्या माध्यमातून स्पेशल मुलांसाठी काम करणाऱ्या राणी चोरे आणि शिरूर पोलिस स्टेशन मधील कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार, संवाद वहिनी च्या प्रमुख दिपाली काळे आदींचा युवा स्पंदन मधील युवकांकडून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेतील प्रियांका धोत्रे, आकांक्षा वळे, पायल वर्मा, अश्विनी कोठावळे, खुशी गुगळे, अजिंक्य महाजन, गणेश जगताप, रोहित सोनवणे, राहुल उल्हारे ,आशिष ऊबाळे, शंतनु जगताप आदी उपस्थित होते.या प्रसंगी सर्व मान्यवरांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत, युवा स्पंदन संस्थेचे या संस्थेतील युवकांचे ते करत असलेल्या कामासाठी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या