दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनास गांभिर्य नाही ?

Image may contain: one or more peopleशिरूर,ता.१२ मार्च २०१९ (मुकुंद ढोबळे) : शिरूर तालुक्यात मोठया प्रमाणात दुष्काळ परिस्थिती असूनही अद्याप महसुल,पंचायत समिती प्रशासन यांच्याकडे यंदाच्या भीषण दुष्काळाकरीता कुठलाही ठोस आराखडाही नसून ही दोन्ही खाती सध्या दुष्काळ परिस्थितिशी सामना करण्यास पूर्णपणे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

दुष्काळ आढावा बैठक झाल्या दोनवेळा..परंतु ठोस निर्णय नाहीच..

सध्या सम्पूर्ण राज्यात दुष्काळ परिस्थिति आहे त्यात शिरूर तालुक्याचा समावेश आहे.शिरुर तालुका कमी पावसाचा तालुका म्हणून गणला जातो आहे त्यात या तालुक्यांत मोठया प्रमाणात सिंचन झाले आहे,त्यामुळे मोठया प्रमाणात बागायती क्षेत्र निर्माण झाले आहे.धरण क्षेत्रात पाऊस झाला व तालुक्यात कमी झाला तरी धरणाच्या पाण्यावर येथील पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याची अडचण येत नाही.परंतु यावेळी पावसाने खरिप ,रब्बी हे दोन्ही हंगामात सर्वांनाच हुलकावनी दिली आहे. सर्वांच्या आशा-आकांक्षा वर पाणी फिरवले असुन उभी पिके जळून गेली.अडचणीत असणारा शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.त्यात पावसाने धरण क्षेत्रात ही तीच परिस्थिती निर्माण केली आहे. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्णपणे भरली गेली नाही त्याचा मोठा फटका शिरूर तालुक्यात बसणार आहे. सध्या या तालुक्यांत मोठया प्रमाणात दुष्काळ परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे,जनावरांना चा-याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. तर तो आणखी गंभीर होणार असल्याचे चित्र सर्वांना माहिती आहे परंतु यावर नियंत्रण उपाय योजना करणारे महसूल,पंचायत समिती कार्यालय याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते आहे.

घोडधरणातून पाणी सोडावे म्हणून पुर्वभागातील शेतकरी टाहो फोडत आहे तर शिरूर शहरांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे.दिवसा दोन दिवसाआड पाणी येते, तेही कमी प्रमाणात.येवढी गंभीर परिस्थिती आहे.त्यात जनावरे व चाऱ्याची परिस्थिती आणखी गंभीर आहे चारा छावणी सुरू करण्याकडे राजकीय नेते व महसूल, पंचायत समिती अधिकारी गंभीर नाहीत.ते सध्या निवडणुकी करिता गंभीर असल्याचे चित्र आहे.एकीकडे अधिकारी गंभीर नसताना माणिकचंद उद्योग समूहाचे प्रमूक प्रकाशभाऊ धारिवाल यांनी सर्वांच्या अगोदर जनावरे साठी छावणी सुरू केली परंतु आमच्या राजकारणी व अधिकारी यांना सुचले नाही हे आमचे दुर्दैव आहे.

दुष्काळ परिस्थिति गंभीर आहे हे या महसूल व पंचायत समिती खात्याच्या अधिकारी वर्गाला माहिती असूनही सर्वजण झोपायची ढोंग घेऊन गप्प आहे.यापुढे शिरूर तालुक्यांत जनावरांच्या छाँवन्या ,पिण्याचे टॅंकर,पाणी साठे ताब्यात घेणे,विहिरी ताब्यात घेऊन नियोजन करने गरजेचे आहे. भीषण दुष्काळात सर्वाना पिण्याचे पाणी,जनावरांना चारा,भेटणे गरजेचे आहे त्यासाठी या दोन्ही खात्याने आज नियोजन करावे. त्यासाठी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद याची भूमिका महत्वाची असताना याबाबत हे सर्वच खाती अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. या खात्यातील अधिकारी यांना जागे करण्याची गरज असून अन्यथा पुढील काळात 1972पेक्षा भीषण दुष्काळात तोंड देताना सगळ्यांच्या तोंडचे पाणी नक्की पळणार यात शंका नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या