...जेव्हा पवार साहेब 'त्या' कार्यकर्त्याची दखल घेतात

Image may contain: 10 people, people standingशिरुर,ता.१३ मार्च २०१९(प्रतिनीधी) : स्वत: अपंग असुनही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर राष्ट्रवादीचे प्रामाणिक काम करणा-या त्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: सन्मान करतात तेव्हा माञ त्या कार्यकर्त्यालाही गगन ठेंगणे होते.

शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील सुदर्शन जगदाळे हे गेल्या अनेक वर्षांपासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतात.त्यांचे हेच काम पाहुन पक्षानेही त्यांच्यावर जबाबदारी सोपवत महाराष्ट्र राज्य सोशल मिडियाचे सचिव पद दिले आहे.जगदाळे हे अपघाताने अंथरुनावर खिळुन असले तरी केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर काम करत असुन सोशल मिडियावर पक्षाचे काम करत असतात.त्यांचा १ कोटी अजित पवार व सुळे समर्थक या ग्रुपच्या माध्यमातुन राज्यातील लाखो लोकांशी जोडले गेले आहेत.त्यांच्या या कामाची दखल माजी उपमुख्यमंञी अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांसह राज्यातील बड्या नेत्यांनी दखल घेतली आहे.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या 'साहेबसंवाद' या कार्यक्रमात देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते, सुदर्शन जगदाळे) यांना 'संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ' देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जगदाळे यांनी बोलताना, "या भावना शब्दात उतरवणे माझ्यासाठी कठीण होत आहे. खऱ्या अर्थाने मी आज निशब्द झालो आहे. आयुष्याने अनेक गोष्टी माझ्याकडून हिरावून घेतल्या.परंतु त्याच प्रमाणे काही अनमोल गोष्टीसुद्धा माझ्या झोळीत टाकल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे संपूर्ण "पवार" कुटुंबियांचे प्रेम" अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे,वंदना चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड,जि.प.सदस्य रोहितदादा पवार, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील,शिरूर-हवेलीचे माजी आमदार अॅड्. अशोक पवार, रूपालीताई चाकणकर, प्रदेश युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, ऋषिराज अशोक पवार, पोपटराव जगदाळे तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सोशल मीडियावर कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आदि उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या