शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे-शर्मिला पवार

Image may contain: 3 people, people sittingनिमोणे,ता.१३ मार्च २०१९(तेजस फडके) :  सध्या शेतकरी शेतीत जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करत असतो परंतु रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेती नापीक होत चालली असुन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बारामती येथील शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.

शिंदोडी (ता. शिरुर) येथील १६ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिंदोडी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या नाम फलकाचे अनावरण नुकतेच शर्मिला पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या शेतकऱ्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबुन न राहता एकत्र येऊन कंपनी स्थापन करुन शेतीपुरक उद्योग व्यवसाय केल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार म्हणाल्या, पुणे जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शेतीला पाट पाण्याने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करुन अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा.

याप्रसंगी बारामती येथील शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार,पुणे जिल्हा परिषदच्या कृषी व पशुसंवर्धनच्या सभापती सुजाता पवार,शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दासगुडे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,प्रल्हाद वरे, अमोल पवार,पुणे येथील अफार्म कंपनीचे तालुका विस्तार अधिकारी मनोज जाधव,डॉ.हिरामण चोरे,शिंदोडी फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष तेजस फडके,सचिव गणेश भोस,ग्रा.प.सदस्य एकनाथ वाळुंज,सुरेंद्र देव व मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या