जिद्दीच्या जोरावर त्याची फौजदारपदाला गवसणी...

शिरुर,ता.१५ मार्च २०१९(प्रतिनीधी) : तलाठी म्हणुन काम केले त्यानंतर शिक्षक म्हणुनही काम पाहिले परंतु इथंच न थांबता जिद्दीच्या जोरावर त्यांनी फौजदारपदाला गवसणी घातली.
हि कहाणी आहे एका युवकाची.तुषार भोर असे या युवकाचे नाव आहे.मुळ गाव अकोळनेर असलेल्या तुषार चे प्राथमिक शिक्षण आंबळे गावात मामांकडे झाले.उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला येथे झाले.कुरुंद येथील संस्थेत डी.एड.केले.दरम्यान च्या काळात तलाठी म्हणुन नियुक्ती झाली.तलाठी म्हणुनही काही दिवस काम पाहिले.त्यानंतर शिक्षक म्हणुनही काही काळ नोकरी केली.परंतु यावर स्वस्थ न बसता  नोकरीवर पाणी सोडुन पुर्णवेळ एमपीएससी चा अभ्यास करायचा अन ध्येय गाठायचे असे ठरवुन अभ्यास सुरु केला.अन कठोर मेहनतीच्या जोरावर त्यात उत्तीर्ण होउन फौजदारपदाला तुषार यांनी गवसणी घातली.

तुषार चे वडील अर्जुन भोर हे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख असुन आई अलका अर्जुन भोर या शिक्षिका आहेत.या यशात आई-वडील व मिञपरिवाराचा खारीचा वाटा असल्याचे तुषारने बोलताना सांगितले.निवडीबद्दल शिरुर तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या