शिरुर शहरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

Image may contain: 3 people, people sitting and indoorशिरूर,ता.१६ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरूर शहरात गेल्या काही दिवसापासून पाणीटंचाई तीव्र झाली असून रस्तोरस्ती रिकामे पाण्याचे हंडे  बरल घेवून पाण्याच्या टंकरची वाट पहात असलेले लोक असे चित्र शहरातील विविध भागात दिसत असून पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त झाले.

दरम्यान शिरूरच्या कोल्हापूर बंधारात डिंभे धरणातून सोडलेले पाणी रविवार दिनांक १७ मार्च पर्यत पोहचेल आणी त्यांनतर शहरातील पाणीपुरवठा सुरुळीत होईल अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वतीने देण्यात आली आहे.

शिरूर शहराला घोडनदीवर असणा-या  कोल्हापूर बंधारातून पाणीपुरवठा केला जात असतो. या बंधा-याची  पाण्याची साठवणक्षमता ५५ दक्षलक्ष घनफूट आहे. मागील काही दिवसापासून शहराला पाणी पुरवठा करणा-या कोल्हापूरपध्दतीचा बंधारा कोरडा पडल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

शिरूरच्या कोल्हापूर बंधारात पाणी आवर्तन  सोडावे अशी मागणी पालिकेचा वतीने दिनांक १५ फेब्रुवारीला करण्यात आली होती. दरम्यान बंधारातील पाणी साठा कमी होत असल्याचा पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी पासून शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर २ मार्च पासून पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात आला होता. तर ११ मार्च पासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ण ठप्प झाला. दरम्यान पालिकेने पाण्याचे आर्वतन सोडावे अशी मागणी केली होती. दिनांक २ मार्चला मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प समितीचा बैठकीत शिरूर शहरासाठी नदी मार्गे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार ६ मार्चला नदी द्वारे पाणी सोडण्यात आले. सुमारे ६०० क़्युसेस वेगाने हे पाणी सोडण्यात आले असले तरी नद्या मध्ये असणारे खड्डे आणि इतर कारणाने पाण्याची वाटचाल मंदावलेली असून रविवार दिनांक १७ मार्च रोजी ते शिरूर मधील हत्ती डोह येथील कोल्हापूर बंधारात पोहचेल व त्यानंतर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. दिनांक १५ मार्च रोजी पाणी आमदाबाद येथे पोहचले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचा वतीने देण्यात आली. हे पाणी बंधारात पोहचल्यावर पुढील दोन ते सव्वा दोन महिने पाणी शहराला  पुरेल अशीही माहिती देण्यात आली.

दरम्यान शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा पार्श्वभूमीवर पालिकेचा वतीने पाण्याचा १०  टॅकर द्वारे दररोज सहा खेप्या द्वारे शहरातील विविध भागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  शहराच्या आसपासचा परिसरातून टॅकर साठी पाणी उपलब्ध होत आहे. या टॅकर मधील पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून अनेक ठिकाणी रांगेत थांबूनही पाणी न मिळाल्याने नागरिक राग व्यक्त करीत आहेत.

शहरातील लाटेआळी,काची आळी,पारधी वस्ती, प्रोफेसर कॉलनी समोर, सय्यदबाबानगर,लोटनशहा दर्गा,मदारीवस्ती,भाजीबाजार,जोशीवाडी,आंबेडकर उद्यान शांतीनगर, जोशीवाडी आदी १४ भागात नागरिकांच्या सोयीसाठी दोन हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टाक्या ठेवण्यात आल्या असून या टाक्याद्वारे लोकांना पाणीपुरवठा करण्यात येईल असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वतीने सांगण्यात आले. त्याच बरोबर शहरातील मारुती आळी आणि जिजामाता उद्यान जवळ पाण्याचे आरोह मशीन बसविण्यात आले असून या ठिकाणाहून नागरिकांना ५ रुपयेत २० लिटर मिळणार आहेत. आंबेडकर उद्यान आणि काची आळी परिसरात ही मशीन बसविण्यात येणार आहे.शहरात पालिकेचे पाण्याचे ६३ बोअरवेल असून त्यातील ५८ चालू आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या