माणुसकी अन निष्ठुरतेची रुपे जेव्हा पहायला मिळतात...

शिरुर,ता.२१ मार्च २०१९(प्रतिनीधी) : राञीची अकराची वेळ..पुणे नगर महामार्गावर वाहनाची पादचा-याला धडक. गर्दी जमु लागते..गर्दीतुन एक पुढे येतो अन त्याच्या संवेदनशीलतेने त्या जखमीला तत्काळ उपचार मिळतात.यावेळी माणुसकिची अन निष्ठुरतेची दोन रुपे पहायला मिळतात.
 
सविस्तर असे कि,रात्री अकरा सव्वाअकराच्या सुमारास साधारणपणे शिरुर-अहमदनगर रस्त्यावर  वर जलराणी हॉटेलच्या समोर रस्ता ओलांडणा-या पादचारी व्यक्तीस धडक देउन वाहन जोरात निघुन जाते.यावेळी जवळच असणा-या गर्दीने अपघातस्थळी धाव घेतली. घटना डोळ्यासमोर पाहणा-या शिरुर येथीलच केदार गोंगले, डॉ.रुचा गोंगले यांनी तत्काळ जवळच असणा-या श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये अॅम्ब्युलन्स व वैद्यकिय मदतीची विनंती केली.हॉस्पिटल मधील डॉ.सौरभ पाठक हे घरी निघाले असता घटना समजातच त्यांनी घटनास्थळी धाव घेउन जखमीवर जागीच प्रथमोपपचार करत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी श्री गणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अखिलेश राजुरकर, डॉ.विशाल महाजन, डॉ.सारंग पाठक, ऋषिकेश चव्हान, राजु नाईक, ऋतुराज चव्हान व उपलब्ध हॉस्पिटलच्या कर्मचा-यांनी रक्तबंबाळ व जखमीला तत्काळ उपचार सुरु केले. रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्यास तत्काळ पुढील उपचारांसाठी पुणे येथे नेणे गरजेचे असल्याने आवश्यक उपचार करुन त्यास १०८ अॅम्ब्युलन्स मध्ये पुण्याला हलविण्यात आले. दरम्यानच्या काळात मध्यराञ उलटलेली असते. जखमीबाबत कोणताच ओळखीचा पुरावा नसल्याने जखमीबाबत माहिती कळू शकली नाही.   

पुणे-अहमदनगर रस्त्यावर वाहनांचा वेग जास्तच असतो. समोर पादचारी रस्ता  ओलांडत आहे हे दिसत असतानाही वाहनचालकाने दाखवलेला निष्ठुरता यावेळी उपस्थितांनी पाहिली त्याबरोबरच अनोळखी व्यक्तीस राञी तत्काळ मदत करुन व उपचार करणा-या डॉक्टरांच्या माणुसकिचा प्रत्यय आला असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या