प्रा. संदीप घावटे यांना 'उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार'

Image may contain: 11 people, people smiling, people standing
देवदैठण, ता.२१ मार्च २०१९(प्रतिनीधी) : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांना क्रीडा क्षेत्रातील  उत्कृष्ट कार्याबद्दल " उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न "पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांना नाशिक येथील के.एन.डी बहुउद्देशीय मंडळ व क्रीडा साधना यांच्या वतीने "उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न"पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.हा पुरस्कार नाशिक चे क्रीडा उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या शुभहस्ते मिळाला.

प्रशालेतील अनेक खेळाडू राज्य,राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविण्याचे काम घावटे यांनी केले आहे.आतापर्यंत तालुका व जिल्हयाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक संभाजी शेळके, धनाजी खरमाटे, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु.म.परदेशी, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा,पंचायत समिती सदस्या कल्याणी अतुल लोखंडे, सरपंच जयश्री विश्वास गुंजाळ, उपसरपंच पुजा वसंत बनकर,सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी घावटे यांचे अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या