शिरूर तालुक्यातील 3 पोलिस अधिकाऱयांना विशेष सेवा पदक

Image may contain: 3 people, people smiling, text
शिरूर, ता. 21 मार्च 2019: शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या गावामधील तीन सुपुत्रांना एकाच वेळी पोलिस दलातील विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे. यामुळे पिंपळे धुमाळ गावासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शिरूर तालुक्यातील विविध पोलिस अधिकारी राज्यात महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेव व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त विभागात कठीण व खडतर कामगिरीबद्दल पिंपळे धुमाळ गावामधील सुपुत्र व महाराष्ट्र पोलिस दलात कळवा जिल्हा ठाणे येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस (ACP) पदी कार्यरत असणारे रमेश मल्हारी धुमाळ, पुणे
मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन शहाजी धुमाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजित शिवाजी शिवरकर यांना विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.

2014 ते 2016 या कालावधीत नक्षलग्रस्त विभागात केलेल्या पोलिस सेवेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. राज्य सरकारने पदकाची नुकतीच घोषणा केली आहे. शिरूर तालुक्यातील एकाच गावातील तीन अधिकाऱयांना एकाच वेळी पदक जाहिर झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या