तळेगाव ढमढेरेला शिवजयंतीनिमित्त ७० जणांनी केले रक्तदान

Image may contain: 4 people, outdoorतळेगाव ढमढेरे,ता.२४ मार्च २०१९(प्रतिनीधी)  : तळेगाव ढमढेरे येथे शिवजयंती उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात  ७० जणांनी रक्तदान केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिरात परिसरातील लोकांनी व युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास ग्रामदैवत श्री शंभोनाथ महाराज चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला.

दुपारी  पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  संपूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची  पालखी हरिनामाच्या गजरात वाजत-गाजत काढण्यात आली या पालखीचे सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेतले. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक व युवक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. 

सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला तर रात्री शिवव्याख्याते राहुल कराळे (नगर) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमास परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठानच्या अशा सर्व कार्यकर्त्यांनी शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या