शिरुरच्या आखाड्यात अभिनेत्यापेक्षा नेत्याची हवा जास्त

Image may contain: 5 people, people smilingशिरुर,ता.२४ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचा उत्साह पहायला मिळत असुन अभिनेत्यापेक्षा पैलवान असलेल्या नेत्याच्या भाषणाचीच जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येते.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहिर केली.त्यानंतर कार्यकर्त्यांनी मरगळ झटकत जोरदार काम सुरु केले आहे. परंतु अभिनेते डॉ. कोल्हे यांच्याबरोबरच जोरदार चर्चा होत आहे ती पैलवान मंगलदास बांदल यांची. शिरुर तालुक्यात प्रत्येक गावोगावी दांडगा जनसंपर्क असलेल्या अन तळागाळात पोहोचलेल्या पैलवान मंगलदास बांदल यांचे भाषण म्हटले कि, शिरुर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात अनेकांच्या भुवया उंचावतात. कोणताही कार्यक्रम असो पैलवान बांदल यांचे भाषण ऐकायला अनेकजन उत्सुक असतात.लोकसभेची तयारी जोरदार करत बांदल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघात ताकद दाखवुन दिली होती. त्याबाबत त्यांनी अनेकवेळा विविध कार्यक्रमात उमेदवारीबाबत  भाष्य केले होते. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर बांदल यांचे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असलेले भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे अनेकांना माहित आहे.

बांदलांच्या भाषणात टाळया, शिट्टया, जयजयकार, हास्याचा लयलोट तसेच चौफेर टिका अन कोपरखळ्या हे अनुभवायला मिळतात. यंदाच्या निवडणुकिच्या फडात स्वत: उमेदवार म्हणुन मागे घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे दादा अन साहेब यांच्यासमोर जाहिरपणे त्यांनी दिलेली कबुली अन केलेली जोरदार फटकेबाजी यांची सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा असुन अभिनेत्यापेक्षा या नेत्याचीच हवा जास्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या