शिरूर लोकसभेसाठी शिरूर तालुका कोणाच्या पाठीशी?

Image may contain: 2 people, beard
शिरूर, ता. 24 मार्च 2019: शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीने आढळराव यांना टक्कर देण्यासाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना रणांगणात उतरवले आहे.

शिरूर लोकसभेसाठी काटे की टक्कर अशी लढत होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी शिरूर तालुक्यातील नेते एकत्र आले असून, त्यांचे मनोमिलन झाल्याचे तरी व्यासपीठावरून पहायला मिळत आहे. काही करून कोल्हे यांना विजयी करायचेच असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील हे चौकार मारण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून, सोशल मीडियाचाही मोठा वापर सुरू केला आहे.

पण... शिरूर तालुक्यातील नागरिकांचा कोणाला पाठिंबा असणार आहे? अथवा कोणाच्या पाठीशी उभा राहणारे, हे पाहणे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे www.shirurtaluka.com ने मतचाचणी घेऊन हे चित्र सर्वांसमोर ठेवत आहे. तुम्हाला काय वाटते? याबाबत प्रतिक्रिया अथवा मतचाचणीच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा...Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या