कोळगाव डोळसला गोळी सुटून माजी सैनिकाचा मृत्यू

Image may contain: 1 person, smiling, night and closeupकोळगाव डोळस, ता.२७ मार्च २०१९ (प्रतिनीधी) : पिस्तुल साफ करताना अचानक गोळी सुटुन कोळगाव डोळसला माजी सैनिकाचा मृत्यु झाल्याची  घटना घडली.

किसन सखाराम पडवळ (वय.४२, रा.कोळगाव डोळस) असे मयत झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पडवळ हे स्वत:च्या मालकीचे पिस्तुल साफ करत होते. यावेळी पिस्तुलातुन अचानक गोळी सु्टुन ती गोळी पडवळांच्या कपाळाला लागली.

यात त्यांचा मृत्यु झाला.याबाबत त्यांचे मेहुणे विश्वास मिठे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. घटनेची महिती कळताच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी तातडीन घटनास्थळी जाउन भेट दिली.राञी उशिरा न्हावरे येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या