एक मुठ धान्य..अनाथालयासाठी वीस गोण्या धान्य जमा

Image may contain: one or more people, people standing, shoes, crowd, child and outdoorदेवदैठण,ता.२७ मार्च २०१९(प्रा.संदीप घावटे) : श्रीगोंदा येथील अग्नीपंख फाऊंडेशनचा एक मुठ धान्य अनाथांसाठी या सामाजिक उपक्रमात सहभागी होताना देवदैठण येथील  विद्याधाम प्रशालेतील चिमुकल्यांनी वीस गोण्या धान्य जमा केले . यास देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही हातभार लावला.

दुष्काळी स्थिती असताना देखील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना अनाथांसाठी मोठ्या प्रमाणात धान्य जमा केले. गहू,ज्वारी, तांदूळ, बाजरी अशा स्वरूपात हे धान्य जमा केले आहे.विद्यार्थ्यांबरोबरच पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, शिक्षिका संजया नितनवरे यांनी प्रत्येकी एक गोणी धान्य जमा केली.तसेच ग्रामपंचायत सदस्या सोनाली भालेकर व शिक्षिका सुनंदा शेळके यांनी धान्य जमा केले. हे धान्य गेवराई येथील बालग्राम अनाथालयाला पाठवले जाणार आहे.

जमलेले धान्य अग्नीपंख फाऊंडेशन कडे सुपूर्द करण्यासाठी उद्योजक मोहन आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिल्याबदल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रा.संजय लाकुडझोडे, कुकडी साखर कारखान्याचे संचालक सुभाष वाघमारे, माजी सरपंच सुनिता वाघमारे, उद्योजक अतुल लोखंडे, मुख्याध्यापक संभाजी शेळके, पत्रकार दिपक वाघमारे,सर्जेराव कौठाळे,ग्रा . सदस्या सोनाली भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप घावटे व संजया नितनवरे यांनी केले.

यावेळी अग्नीपंख फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. संजय लोकुडझोडे यांनी प्रशालेतील गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. तर उद्योजक सर्जेराव कौठाळे यांनी रोख दोन हजार रू गुणवंत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी देणगी दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कौठाळे अमोल कातोरे,संदीप वेताळ, प्रशांत वाळुंज, लक्ष्मण अहिरे, दादाभाऊ बरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या