राष्ट्रवादीचा विजयी ध्वज फडकवाः वळसे पाटील

Image may contain: 2 people, eyeglasses, beard and closeup
शिरूर, ता. 28 मार्च 2019: जिल्हा परिषद, पंचायत समिती व आपापल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या नेटाने लढवितो. अगदी त्याच जिद्दीने लोकसभेच्या या निवडणुकीत प्रचाराचे नियोजन करा व ही निवडणूक आता तुम्हीच हातात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी ध्वज फडकवा, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार नियोजनाची बैठक नुकतीच रांजणगाव एमआयडीसीत पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे व पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर-आंबेगाव मधील प्रचाराचे नियोजन करण्यात आले. बैठकीनंतर श्री. वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, "राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी शिरूर लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन करावे. गावकारभाऱ्यांनी आपापल्या गावात थांबून लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा, उमेदवाराचे व्यक्तिमत्व व शेतकरी; तसेच समाजविषयक धोरण लोकांपर्यंत पोचवावे.''

यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, प्रकाश पवार व राजेंद्र गावडे, सुनीता गावडे, सविता बगाटे व स्वाती पाचुंदकर, विश्‍वास कोहकडे, सुभाष उमाप, अरूणा घोडे, सविता पऱ्हाड, सदाशिव पवार, कांतिलाल गवारे, देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या