Dr Amol Kolhe डॉ. अमोल कोल्हे 'नॉट रिचेबल'चा आरोप खोटा

Image may contain: 21 people, people smiling, crowd
शिरूर, ता. 31 मार्च 2019: शिरूर लोकसभा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे 'नॉट रिचेबल' असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. शिवाय, तसे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, हा आरोप निरर्थक असून, शिरूर तालुक्यामध्ये त्यांच्या सभा होत आहेत.

डॉ. कोल्हे यांनी शनिवारी (ता. 30) कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ते शिरूरपर्यंत विविध गावांत गावभेट दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेत कोपरा सभा घेतल्या, त्या वेळी ते बोलत होते. नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"मी मतदारसंघात जनतेच्या गाठीभेटी घेत असतानाच माझ्यावर "नॉट रिचेबल' असल्याचा विरोधकांचा आरोप निरर्थक आहे. "स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेनंतर मालिकाविश्वातून विश्रांती घेऊन पूर्णवेळ समाजकारणासाठी देणार आहे,'' अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

'जनतेची सेवा व छत्रपतींचा खरा इतिहास समाजापुढे येणे, या दोन्ही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सध्या मी 20-20 तास काम करीत आहे. मात्र, तरीही विरोधक टीका करीत असतील; तर त्यांच्या विचारशून्य टीकेला जनताच योग्य उतर देईल,' असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गावभेट दौऱ्यानिमित्त डॉ. अमोल कोल्हे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांसह तरुणांचा मोठा सहभाग होता. बैलगाडा शर्यत सुरू करणारच, असे ठामपणे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या वेळी परिसरातील बैलगाडामालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील सरदार बाबाजी ढमढेरे यांचा इतिहास संभाजी महाराजांच्या मालिकेत डॉ. कोल्हेंनी जगासमोर आणला; त्याबद्दल येथील ढमढेरे परिवारातर्फे डॉ. कोल्हे यांचा सरदार बाबाजी ढमढेरे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Shirur Loksabha 2019 : डॉ. अमोल कोल्हे 'नॉट रिचेबल'

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglasses
शिरूर, ता. 29 मार्च 2019: शिरूर लोकसभचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे 'नॉट रिचेबल' असल्यामुळे पक्षाचे नेते व कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

शिरूर लोकसभेसाठी प्रचाराची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, डॉ. कोल्हे हे चित्रिकरणात व्यस्त असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते त्रस्त झाले असल्याचे समजते. डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी जाहिर झाल्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. परंतु, गेल्या चार दिवसांपासून कोल्हे यांचा प्रचार बंद झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रचाराचे नियोजन करत आहेत. परंतु, कोल्हे यांचा संपर्क होत नाही. दुसरीकडे शिवसेनचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मोठ्या प्रचारसभा घेत आहेत.

डॉ. कोल्हे यांना पाहण्यासाठी गावागावांमधील नागरिक वाट पाहताना दिसत आहेत. किमान एकदातरी त्यांनी आपल्यापर्यंत पोहचावे, अशी मतदारांची इच्छा आहे. शिवाय, डॉ. कोल्हे 'नॉट रिचेबल' असल्यामुळे कार्यकर्त्यांना नेत्यांकडून मार्गदर्शन मिळत नाही, अशी तक्रार पुढे येत आहे. ऐन निवडणूकीच्या काळात उमेदवाराच 'नॉट रिचेबल' असेल तर पुढे कसे होणार, अशा नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. सोशल मीडियावरही नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे हे जेवढे 10 दिवसांत मतदारसंघात फिरले आहेत, तेवढे आढळराव अख्या 15 वर्षात सुद्धा नाही फिरले नाहीत. आढळराव तर निवडणूक ते निवडणूक दिसतात. आम्हाला त्यामुळे प्रसार आणि प्रचार माध्यमाच्या बाबतीत डॉ. अमोल कोल्हे कुठे कमी पडतात, असे आम्हाला जनतेला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या