वडगाव रासाईत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वडगाव रासाई,ता.३० मार्च २०१९(प्रतिनीधी) : वडगाव रासाई(ता. शिरुर)येथे एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना घडली.

शिवानी रमेश ननवरे (वय-16 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीची नाव आहे.या प्रकरणी रमेश कुशाबा ननवरे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२९) रोजी मयत मुलीचे पालक कामानिमित्त बाहेर गेले होते.दुपारच्या नंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर घरी आले असता घराचा दरवाजा आतुन बंद असल्याचे दिसले.दरवाजा वाजवुन ही आवाज न आल्याने खिडकितुन डोकावले असता स्वयंपाकाच्या खोलीत लोखंडी अॅंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले.या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन आत्महत्येचे कारण मात्र कळु शकले नाही.

या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,जमादार बाळासाहेब खोमणे, आबासाहेब जगदाळे, अशोक तारु हे करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या