शिरुर पोलीसांची अवैध धंद्यांवर कारवाई

शिरुर, ता. ३ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) :  शिरुर पोलीसांनी अवैध धंद्यांविरोधात कडक पावले उचलली असुन ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यात दारुसाठा जप्त केला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे येथे हॉटेल केसरीवर टाकलेल्या छाप्यात मॅकडॉल नं १ रम कंपनीच्या एकुण २२ बाटल्या, मॅकडॉल नं १ व्हिस्कीच्या १० बाटल्या, ऑफिसर चॉइस कंपनीच्या १० बाटल्या, इंपिरियल ब्ल्यु व्हिस्की कंपनीच्या ३ बाटल्या असा एकुण ५८८० रु.किंमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी हॉटेलचे मालक जयदीप बेंद्रे, रचित बेंद्रे यांच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीसांना जांबुत येथे मिळालेल्या माहितीनुसार गणराज हॉटेल वर  टाकलेल्या छाप्यात देशी दारु संञा नावाच्या २२ बाटल्या, देशी गोवा जिन च्या ४ बाटल्या, ऑफिसर चॉइस कंपनीच्या १२ बाटल्या, मॅकडॉल नंबर वन कंपनी विदेशी दारुच्या ४ बाटल्या असा एकुण ३६६४ रुपये किंमतीचा माल जप्त केला. या प्रकरणी दिलीप बाबुराव चेपुरवार (रा.जांबुत) व शेरकर वाईन नारायणगाव यांच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे, सुदाम खोडदे, करणसिंग जारवाल, जितेंद्र मांडगे, कुडेकर यांनी भाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या