मंगलदास बांदल यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड

Image may contain: 1 person, smiling
शिरूर, ता. 3 एप्रिल 2019: मंगलदास बांदल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांना नियुक्ती करणारे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज (बुधवार) पुणे येथे देण्यात आले.

बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. चाकण येथे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉ. कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचार करू. असे सांगितले होते. बांदल यांचे चाकणमधील भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

दरम्यान, बांदल यांच्या निवडीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या