सोशल मिडियावर आढळराव पाटील, अमोल कोल्हे ट्रोल

Image may contain: 2 people, people smiling, beard and textशिरुर,ता.४ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभा मतदार संघाच्या २५ दिवसांवर येउन ठेपलेल्या निवडणुकिसाठी सोशल मिडिया वॉर सध्या सुरु असुन शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस असं युद्ध सोशल मिडियावर पहावयास मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ट्रोल केले जात असुन शिवसेनेकडुन राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.अद्याप उमेदवारी अर्ज दोन्ही पक्षांकडुन दाखल न झाल्यामुळे राजकिय वातावरण तसे फारसे तापले नसून दोन्ही उमेदवारांनी शिरुर तालुक्यात आपआपल्या परीने प्रचार दौ-याची एक फेरी पुर्ण केली आहे.या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये घमासान युद्ध सोशल मिडियावर सुरु असुन गेल्या दहा वर्षात शिरुर लोकसभा मतदारसंघात काय विकासकामे आढ़ळराव पाटील यांनी केली आहे हे सांगताना शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते दिसुन येत असुन तर  राष्ट्रवादीकडुन दहा वर्षात खासदार आढळरावांची मतदारसंघात कुठलीच विकासकामे न झाल्याचे सांगत दिलेली आश्वासनेही पुर्णपणे हवेत विरली असल्याचे राष्ट्रवादी सांगताना दिसत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्यावतीने शिरुर शहरात दोन्ही उमेदवारांचे परिचय पञक वाटण्यात आले. तर शिवसेनेतर्फे शिवाजी आढ़ळराव पाटील यांची दहा वर्षातील कामांच्या कार्याचा अहवाल पुस्तिका वाटण्यात आली. गेल्या तीन टर्म मध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडुन येत असुन यंदा त्यांना बाद केल्याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशारा नेटकरी सोशल मिडियावर देत असल्याचे पहावयास मिळत आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुद्धा सोशल मिडियावर ट्रोल केले जात असुन अभिनेते असलेले कोल्हे हे समाजासाठी किती वेळ देउ शकतात असा प्रश्न नेटिझन्सकडून केला जात आहे. सोशल मिडियावर याबाबत शिरुर लोकसभेत निवडुन कोण येणार याबाबत पोल घेण्याचा ट्रेंड जोरात असून यावरुनही वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअप ग्रुप वर ज्या-त्यापक्षाचे कार्यकर्ते माझाच नेता कसा चांगला आहे, तोच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करताना दोन्ही पक्षांचे समर्थक करताना दिसत आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोशल मिडियावर वॉर अधिकच पेटलेले दिसुन येईल यात शंकाच नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या