मला यश मिळणार हा विश्वास होता: नचिकेत शेळके

पिंपळे खालसा, ता. 7 एप्रिल 2019: येथील नचिकेत शेळके यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 167 वा क्रमांक मिळवला असून, त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. गावामध्ये  रविवारी (ता. 7) त्यांचा सत्कार करण्यात आला. मला यश मिळणार होता, असा विश्वास होता, असे नचिकेत शेळके यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील विविध अधिकारी उच्च पदांवर काम करत आहेत. या अधिकाऱयांच्या पावलावर पाऊल ठेऊन अनेकजण स्पर्धा परिक्षेची तयारी करत असून, त्यामध्ये यश मिळवताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून शिरूर तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होत आहेत, याचा शिरूर तालुक्याला मोठा अभिमान आहे.

नचिकेत शेळके यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तीन वेळा अपयश आल्यावर चौथ्या प्रयत्नात यश मिळवता आले आहे. लोकसेवा आयोगाच्या निकालात १६७ क्रमांक मिळविला आहे. एवढे अपयश पाहून देखील एक दिवस नक्कीच यश मिळणार असा विश्वास होता. अशी भावना नचिकेत यांनी व्यक्त केली. नचिकेत यांचे आई-वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. तर नचिकेत प्राथमिक पर्यंतचे शिक्षण गावी झाले. तर त्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यावर कामाच्या शोधात असताना स्पर्धा परिक्षा देण्याच ठरवल. त्यानुसार अभ्यास करण्यास सुरुवात केली. पण सलग तीन वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश आले आणि चौथ्या प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १६७ वा क्रमांक नचिकेत शेळके यांना मिळाला.

नचिकेत म्हणाले, 'स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप कष्ट घेतले. पण सलग तीन वेळा अपयश आल्याने काही प्रमाणात निराश झालो. मात्र, या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य केल्याने यशस्वी होता आले. मी एवढे अपयश पाहून देखील यशस्वी झालो. त्यामुळे अपयश बाजूला ठेवून पुढच्या तयारी करा. यश नक्कीच मिळते.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या