शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपत्तीत 'एवढी' वाढ

Image may contain: 1 person, eyeglasses and indoor
शिरूर, ता. 10 एप्रिल 2019: शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता असून, चार कोटी 98 लाख 98 हजार 166 रुपयांचे कर्ज आहे.

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेत तीन कोटी 62 लाख 85 हजार 36 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, कुटुंबियांकडे चार कोटी 98 लाख 98 हजार 166 रुपयांचे कर्ज आहे. कर्जात मात्र गतवेळच्या तुलनेत 1 कोटी 17 लाख 12 हजार 700 रुपयांनी घट झाल्याचे आढळराव यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

खासदार आढळराव यांच्या कुटुंबियांकडे मागील लोकसभा निवडणुकीत (2014) एकूण 25 कोटी 38 लाख 80 हजार 475 रुपयांची मालमत्ता होती. शिवाय त्यांच्याकडे विविध बॅंकांचे मिळून सहा कोटी 16 लाख 10 हजार 866 रुपयांचे कर्ज होते. गेल्या पाच वर्षात त्यांनी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड
केली आहे. जंगम मालमत्तेत रोकड, सोने-चांदी, बंधपत्रे, ऋणपत्रे, विमापत्रे आणि शेअर्सचा तर, स्थावर मालमत्तेत शेतजमीन, बिगर शेती जमीन, गाळे, सदनिका आणि लांडेवाडीतील बंगल्यांचा समावेश आहे. आढळराव यांच्याकडे रोख 17 हजार 308 रुपये, पत्नी कल्पना यांच्याकडे 1 लाख 75 हजार 6 रुपये रोख आहेत. स्वतः आढळराव यांच्या नावावर एक बोलेरो गाडी असल्याचे आणि सोने-चांदीचा एकही एकही मौल्यवान दागिना नाही. पत्नी कल्पना यांच्याकडे मात्र एक हजार 513 ग्रॅम (दीड किलोहून अधिक) सोने, तीन किलो चांदी आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने असल्याचे नमूद केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या