डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे आहे 'एवढी' संपत्ती

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglasses
शिरूर, ता. 10 एप्रिल 2019 : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे साडेचार कोटी इतकी आहे.

डॉ. कोल्हे यांच्याकडे असलेल्या वाहनाची किंमत 24 लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे अडीच लाखांचे तर, पत्नीकडे सुमारे आठ लाख रुपयांचे दागिने आहेत.
कोल्हे यांच्यावर 50 लाख रुपयांचे वैयक्‍तिक कर्ज तर, सुमारे 15 लाख रुपयांचे गृहकर्ज आहे. त्यांनी विविध बॅंका, टपाल आणि शेअर्समध्ये सुमारे 57 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव येथे सुमारे साडेसहा एकर जमीन आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या