खासदारांनी कोणती विकासकामे केली?: डॉ. अमोल कोल्हे

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglasses
शिरूर, ता. 13 एप्रिल 2019: खासदारांनी शिवनेरी व वढू बुद्रुक येथे कोणती विकासकामे केली, हे जाहीरपणे सांगावे. विकास झाला असता तर स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला असता. बैलगाडा शर्यतीवर राजकारण करून सर्व सामान्य जनतेला फसविल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्‍चित आहे, असा विश्वास शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

करंदी, पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, खैरे नगर, धामारी हिवरे, खैरेवाडी येथे झालेल्या सभांमध्ये डॉ. कोल्हे बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 'शेतमालाला बाजारभाव नाही, दुग्धव्यवसाय डबघाईला आलेत. बैलगाडा शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. हे प्राणिमित्र संघटनेला पटवून दिले आहे का ? बैलगाडा शर्यतीवर राजकारण करून सर्व सामान्य जनतेला फसविल्याने राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित आहे.

"रक्त सांडले तरी चालेल, पण विमानतळ होऊ देणार नाही, अशी टोकाची भूमिका आढळराव पाटील यांनी सतत घेतली होती. अपयशाचे खापर ते नेहमीच दिलीप वळसे पाटील यांच्यावर फोडतात. ही सवय त्यांनी आता बदलली पाहिजे. देशात अनेक विमानतळे डोंगरी भागात आहेत. गेल्या 15 वर्षांत जे झाले नाही. ती कामे दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावणार आहे,' असेही कोल्हे म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या