इंग्रजी शाळांचं वाढतं फॅड चिंताजनक (वार्तापञ)

शिरूर,ता.१७ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) :  शिरूर तालुक्यात इंग्रजी शाळेचे प्रस्थ वाढत चालले असून,प्रमाणापेक्षा जास्त शाळाना विनाकारण परवानगी देण्यास तालुका व शहर शिक्षण अधिकारी यांना रस का? शिरुर तालुक्यात वाढत चाललेलं इंग्रजी शाळांचं फॅड चिंताजनक आहे.

कुठलेही शाळा परवानगी निकष नसताना शाळा सुरु कशा होतात यामधे काहीतरी आर्थिक झोल नक्की आहे.शिरूर शहर व् तालुका मोठ्या प्रमाणात झालेले सिंचन यामुळे शेतकरी याला आलेले सुगीचे दिवस तर रांजणगाव गणपती येथील ओद्योगिक वसाहत, ते कोंढापुरी ,शिक्रापुर, सणसवाड़ी,कोरेगाव भीमा या पट्टयात पसरलेली कारखानदारी यामुळे हा तालुका सधन झाला आहे,तर कारखानदारी मुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ईथे आला आहे. यामुळे येथील बाज़ार पेठाही मोठ्या झाल्या आहेत. त्यात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असताना,मात्र इंग्रजी शाळा मात्र मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत.

जिल्हा पारिषद शाळा गावा गावात,वाडी, वस्ती पर्यंत पोहचल्या असताना मात्र पालकांचा ओढ़ा इंग्रजी शाळाकडे  वाढलेला आहे परंतु यामुळे तालुका शिक्षण खाते मात्र ज्याला पाहिजे त्याला खिरापत वाटल्या सारखे या इंग्रजी शाळा सुरु करण्याची परवानगी देऊन टाकत आहे.या शाळा सुरु करण्यासाठी अनेक सुविधा ,परिसर ,खेळाचे मैदान,प्रशिक्षित शिक्षक वर्ग,यांची आवश्यकता असते,परंतु कुठलेच नियम अटी न पाळता एक किंवा दोन रूमची खोली असली की या इंग्रजी शाळा सुरु होत आहेत.एका गावात दोन ते तीन इंग्रजी शाळा शहरी व मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावात तर या शाळेचा बाज़ार मांडला आहे.सुरु असलेल्या या इंग्रजी शाळेकडे कुठल्या सुविधा नाही, प्रशिक्षित शिक्षक वर्ग नाही,ना शाळे साठी हवे असे वातावरण नाही.खेळाचे मैदान नाही. कोंबडीचा खुराड्या सारख्या या शाळेच्या खोल्यात फी घेऊन शासनाचे सर्व नियम खूंटीला टांगुण जोरात या शाळा जोमात सुरु असून मात्र याकडे लक्ष्य देणारे शिक्षण खाते मात्र कोमात गेले आहे का?असे वाटत आहे.

या भागात असणाऱ्या अनेक शाळांना परवानगी शाळा दुसरीकडे असेही प्रकार सुरु आहेत.शहरी भागात या इंग्रजी माधमाच्या या शाळा आता गलोगल्ली सुरु झाल्या आहेत. या शाळा परवानगी करीता कुठले नियम अटी शिक्षण विभागाकडे आहेत का नाही ? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.या इंग्रजी माध्यमाच्या शाळावर तालुका व शहर शिक्षण खात्याने लक्ष्य घालून एका गावात नक्की किती शाळाना परवानगी द्यायची याचाही नियम अटी आहेत त्या नुसार परवानगी देने गरजेचे आहे अन्यथा या इंग्रजी शाळेच्या भाऊ गर्दीत विद्यार्थी हरवेल हे नक्की

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या