स्थानिक गुन्हे शाखेकडून 'त्या' खुनाचा अखेर उलगडा

Image may contain: 7 people, people smiling, people standingपाबळ, ता.१९ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) : पाबळ-वरुडे गावाजवळ अज्ञात युवकाच्या सापडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत उलगडा केला असून, या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी कि, बुधवारी (ता. 17) शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाबळ ते वरुडे रोडवर घाटमाथा जवळ अंदाजे 25 ते 30 वयोगटातील एका अनोळखी पुरुषास कोणीतरी अज्ञात व्यक्तीस अज्ञात कारणावरून डोक्यात दगड मारून निर्घृण खून केल्यावरून शिक्रापूर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास शिक्रापुर पोलीसांसह पुणे ग्रामीण गुन्हे शाखा करत होती. वरील दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करून कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी राहुल साहेबराव डफळ (वय -28 वर्षे, रा. रूम नं. 3, शेवंता पार्क, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यास चाकण येथून ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने सदरचा खून हा त्याचे मित्र स्वप्नील गणेश हजारे (रा. कण्हेरसर, ता. खेड) व मयूर तानाजी हजारे (रा. कण्हेरसर, ता. खेड) या मिळून दारू पिल्यानंतर झालेल्या हाणामारीच्या वादातून अर्जुन तानाजी वाजगे याचा खून  केला असल्याची कबुली दिली. सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी नामे राहुल डफळ याची वैद्यकीय तपासणी करून त्यास शिक्रापूर पो. स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, राजु मोमीन, शंकर जम, सुनिल जावळे, शरद भांबळे, दिपक साबळे यांनी शिताफीने करत उघडकिस आणला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या