...अखेर प्रयत्नांमुळे चिमुकला सुखरुप बाहेर (Video)

Image may contain: 1 person, sittingरांजणगाव गणपती,ता.२१ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : पोलीस, नागरिक अन अग्निशामक दलांच्या जवानांमुळे १५ फुट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या चिमकुल्यास सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली.
 
Image may contain: 1 person, smiling, child, outdoor and natureयाबाबत सविस्तर माहिती अशी कि, रविवार(दि.२१) रोजी सकाळी ९ वाजणेच्या सुमारास कारेगाव येथील दादाभाऊ नवले यांच्या कोरडा असणा-या बोअरवेल मध्ये सार्थक राहुल धोञे (वय. दोन वर्षे सध्या रा. कारेगाव, मुळ रा. माउली नगर, आष्टी जि.बीड) हा पडला होता. या घटनेची माहिती कळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चमन शेख,अमोल चव्हाण,रघुनाथ हाळनोर,नाना काळे,गणेश सुतार,संतोष घावटे,गणेश सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रत्यक्ष पाहणी करत पोलीसांनी तत्काळ रांजणगाव एमआयडीसीतील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशामक दलाच्या जवानांनी बोअरवेल मध्ये पडलेल्या चिमकुल्याचा अंदाज घेतला.यानंतर स्थानिकांच्या मदतीने बोअरवेलला समांतर खड्डा घेण्यास सुरुवात केली.अग्निशामक दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या साहाय्याने सुमारे दिड तासांच्या अथक प्रयत्नानंतर सार्थकला १५ फुट खोल वर अडकलेला असतानाही कसोशीने प्रयत्न करत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

Image may contain: 3 peopleत्यानंतर रांजणगाव गणपती येथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले असता,सार्थक च्या पोटात माती दिसुन येत असल्याचे निदान केल्यानंतर पुणे येथील ससुन हॉस्पिटलला पुढील उपचारकामी दाखल करण्यात आले.दरम्यान पुणे येथे दाखल केल्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकल्याला बोअरवेल मधुन बाहेर काढणेकामी पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव चे पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचे अग्निशामक अधिकारी व्हि. व्हि तांडेल व जवान, स्थानिक ग्रामस्थ शहाजी तळेकर, राहुल गवारी, सतीश गवारी, पृथ्विराज नवले, मंगेश आबनावे यांनी मोलाची भुमिका बजावली.

चिमुकल्याला बाहेर काढल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.तर सार्थकच्या कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, अग्निशामक दलाचे जवान यांनी दाखविलेल्या तत्परतेने व केलेल्या अथक परिश्रमामुळेच सार्थक वाचला असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या