शिरूर लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यात हवा कोणाची?

Image may contain: 2 people, people smiling, beard, eyeglasses and text
शिरूर, ता. 23 एप्रिल 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवून व्यक्त होताना दिसत आहेत. प्रचार शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर मतदारांचा कौलही बदलताना दिसत आहे. शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.comने अनेकदा मतचाचण्या घेतल्या. काटे की टक्कर अथवा कौल बदलताना दिसून आला. मात्र, प्रचार शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला असताना आता शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये कोणाची हवा आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना मतचाचणीवरही जरूर मत नोंदवा.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या