'त्यामुळे' झाला शिरूर तालुक्‍याचा कायापालट (Video)

Image may contain: 2 people, people smiling, closeupरांजणगाव गणपती, ता. 24 एप्रिल 2019 (तेजस फडके): "ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच रांजणगावला पंचतारांकित एमआयडीसी आली. त्यामुळे शिरूर तालुक्‍याचा कायापालट झाला. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.

देशातील शेतकरी, व्यापारी, कामगार, कारखानदार, शेतमजूर, बेरोजगार युवक, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांचे केंद्र व राज्य सरकारने कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ वळसे पाटील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी कोल्हे यांच्यासह मंगलदास बांदल यांचे भाषण झाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मला जनतेचा मिळत असलेला अफाट प्रतिसाद पाहूनच शिवाजीराव आढळराव पाटील यांना आत्ताच आपल्या पराभवाची चाहूल लागली आहे. उसने अवसान आणण्यासाठी त्यांनी मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांची फौजच बोलावली असली, तरी आपल्याला त्याची फिकीर नाही. आढळराव यांच्या पाठीशी केंद्रीय मंत्री असले तरी माझ्या पाठीशी मतदारसंघातील जनता आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी बाभूळसर खुर्द (ता. शिरूर) येथे आयोजित गावभेट दौऱ्यात व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या