पोलीस स्टेशनचा व्याप सांभाळत ते झाले पोलीस उपनिरीक्षक

Image may contain: 1 person, hatशिरुर,ता.२६ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनला दैनंदिन कामाचा व्याप सांभाळत त्यातही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर झेप घेतली आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस शिपाई अतुल बाळासाहेब पखाले यांची पोलीस खात्यांतर्गत घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदावर वर्णी लागली आहे. पखाले हे सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावचे रहिवासी आहेत.पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्यानंतर त्यांची सन-२०१० मध्ये पोलीस खात्यात भरती झाली.पुणे ग्रामीण ला प्रथम नेमणुक झाल्यानंतर प्रथमच शिरुर पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.या दरम्यानच्या काळात अभ्यासाची आवड माञ स्वस्थ बसु देत नव्हती.त्यामुळे शिरुर जवळच बाबुराव नगर येथील अभ्यासिकेत दैनंदिन कामाचा डोलारा सांभाळत अभ्यास सुरुवात केली.अभ्यास अन दैनंदिन कर्तव्य सांभाळत कठोर मेहनत घेत दरम्यानच्या काळात उपनिरीक्षक पदाची परिक्षा दिली.व त्यात ते उत्तीर्ण झाले.त्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली.

त्यांच्या यशाबाबत  तत्कालीन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सध्या सोलापुरचे विशेष शाखेचे प्रमुख दयानंद गावडे,यवतचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी प्रोत्साहन दिल्याचे सांगत  पोलीस स्टेशनचे इतर सहका-यांनी मदत केल्याचे सांगत आई सुरेखा,पत्नी रेणुका, भाउ राहुल पखाले यांचे श्रेय असल्याचे सांगत वैभव चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर यांचे अभ्यास करताना मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.त्यांचे या निवडीबद्दल शिरुर पोलीस स्टेशन व शिरुर परिसरात अभिनंदन केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या