करंदीत वायुवाहिनीचे काम पाडले बंद

Image may contain: one or more people, sky and outdoorकरंदी, ता. २६ एप्रिल २०१९ (विशाल वर्पे) : करंदी (ता. शिरूर) येथे सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनचे काम स्थानिक शेतकऱ्यांनी अडवले. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता जबरदस्तीने काम सुरू करत असल्याने स्थानिक शेतकरी करंदीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक ढोकले आक्रमक होत काम बंद पाडले आहे.

Image may contain: 5 people, people sitting, table and indoorगेल्या आठ दिवसांपासून महेश गॅस एजन्सी या गॅस पाईपलाईन चे काम करंदी परिसरात सुरू आहे. यापूर्वी केंदूरचे शेतकरी एकत्र येत हे काम बंद केले होते त्यांनंतर त्याठिकाणचे काम तात्पुरते बंद करून जातेगावच्या दिशेने काम सुरु केले.दरम्यान जातेगावच्या काही शेतकऱ्यांनी देखील विरोध दर्शविला होता परंतु त्यावेळी शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश आले होते मात्र आज करंदी या ठिकाणी अशोक ढोकले यांच्या वडिलोपार्जित असलेल्या जमीन मधून चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गालागत जाणाऱ्या या पाईपलाईनची कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याने कामासाठी त्यांनी विरोध दर्शविला. यावेळी शेजारील शेतकरी देखील आक्रमक होत हे काम बंद करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली. दरम्यान त्याठिकाणी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक दिवटे यांनी मध्यस्थी करत काम बंद न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्यात शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या दालनात बैठक झाली परंतु यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे आमच्या माहितीनुसार कोणतीही शासनाची कायदेशीर परवानगी नसून तरीदेखील हे अधिकारी मुजोर पणे अरेरावीची भाषा करत आम्हाला सामाजिक बांधकाम विभागाची परवानगी असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या परवानगीची गरज नसून आमचे काम नियमित असल्याने आम्ही काम बंद करू शकत नाही असं यावेळी त्यांनी सांगितले.

दरम्यान सामाजिक बांधकाम विभागाने आमची कोणतीही जमीन संपादित केली नसून कुठेही राज्य महामार्गाचे हद्द निश्चित केली नसून देखील या कंपनीला या प्रशासनाने परवानगी दिलेली बेकायदेशीर आहे या बेकायदेशीर कामाला आमची हरकत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी ढोकले आणि इतर शेतकऱ्यांनी मिळून चाकण - शिक्रापूर लागत असलेल्या वडिलोपार्जित जमिनीतून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही लेखी किंवा तोंडी पूर्वसूचना न देता कोणतीही हद्द निश्चित न करता वायुवाहिनी कायद्याची अंमलबजावणी न करता जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आमच्या शेतजमिनीतून बेकायदेशीर क्रेन आणि मशीनच्या साह्याने गॅस पाईपलाईनचे काम सुरू केले असून आमची या कामाला हरकत आहे तरी या बोगस आणि बेकायदेशीर परवानगीची तसेच बेकायदा कामाच्या पोलिस संरक्षणाची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये सुपूर्त केला असून  तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देखील असाच अर्ज देणार असल्याचे अशोक ढोकले यांनी सांगितले. यावेळी सुदर्शन ढोकले, पांडुरंग ढोकले, कैलास ढोकले, बाळासाहेब ढोकले, उत्तम ढोकले, राजाराम ढोकले, योगेश ढोकले, बाळू ढोकले, शरद दरेकर यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या