शिक्रापूर येथून सासरी चाललेली महिला बेपत्ता

Image may contain: 1 person, close-upशिक्रापूर, ता. ३ मे २०१९ (प्रतिनीधी) : शिक्रापूर येथे माहेरी आलेली महिला पुन्हा सासरी जात असताना बेपत्ता झाली असल्याची घटना घडली असून बेपत्ता महिलेच्या भावाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे संगीता विठ्ठल पगडे (वय ४६ वर्षे, रा. चऱ्होली ता. हवेली जि. पुणे) या त्यांचा भाऊ गोरक्ष भीमराव जगताप यांच्याकडे माहेरी आलेली होत्या. बुधवार(दि. १ मे) रोजी सकाळी ही महिला पुन्हा सासरी जाण्यासाठी शिक्रापूर येथून निघाली परंतु सायंकाळ पर्यंत सासरी पोहोचली नाही. त्यामुळे सर्वांनी त्या महिलेचा परिसरात तसेच सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला परंतु महिला कोठेही मिळून आली नाही.

त्यामुळे सदर महिलेचा भाऊ गोरक्ष भीमराव जगताप (रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे )यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेचे वर्णन हे उंची चार फुट दोन इंच, अंगाने सडपातळ, लांब केस, उभट चेहरा अंगात चॉकलेटी रंगाची साडी, गळ्यात मनीमंगळसूत्र असे वर्णन आहे.  सदर महिलेबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या