शिरुरच्या श्री गणेशा हॉस्पिटलला 'NABH'चे मानांकन
शिरुर, ता.३ मे २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर शहरातील श्री गणेशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला वैद्यकिय क्षेञातील एन.ए.बी.एच हे गुणवत्तेचे मानांकन मिळाले असल्याचे माहिती श्री गणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अखिलेश राजुरकर, डॉ. विशाल महाजन यांनी दिली.
शिरुर शहरात वैद्यकिय क्षेञात रुग्णसेवेत सामाजिकतेची जोड जोपासणारे हॉस्पिटल अशी या रुग्णालयाची ओळख असुन रुग्णसेवेत गुणवत्तापुर्ण सेवेसाठी (एन.ए.बी.एच.) हे मानांकन दिले जाते. या मध्ये हॉस्पिटल ला असणा-या सुविधा,रुग्णांची घेतलेली काळजी, हॉस्पिटलची स्वच्छता, वैद्यकिय घन कचरा व्यवस्थापन, आणिबानी व्यवस्थापन आदी गोष्टींची पडताळणी केली जाते. या सर्व बाबींची पडताळणी नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अॅंड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स या नवी दिल्लीच्या संस्थेमार्फत केली जाते व यानंतरच हे मानांकन दिले जाते.
एन.ए.बी.एच.हे मानांकन मिळणारे श्री गणेशा हॉस्पिटल पुणे-नगर महामार्गावरील व शिरुर शहरातील पहिलेच हॉस्पिटल ठरले असल्याचे सांगत हॉस्पिटलचे संचालक डॉ.विशाल महाजन, डॉ.सौरभ पाठक, डॉ.सारंग पाठक, डॉ.राजेंद्र ढोले, ज्युहिता सिंन्हा, डॉ.सागर केदारे, सुरज खरात, गिरिजा आपरे, श्रीपाद आमले,पंकज गायकवाड,स्वप्नाली सपकाळ व सर्व स्टाफ च्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे डॉ.अखिलेश राजूरकर यांनी सांगितले.