आपत्तीतील पीडितांना मदत करणे कर्तव्य: योगेश ओव्हाळ

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorशिरुर, ता.५ मे २०१९(प्रतिनीधी) : आपत्तीतील पीडित कुटुंबाला सामाजिक जाणिवेतुन मदत करणे हे कर्तव्य असुन यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे यावे असे मत माजी शिवसेना शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी व्यक्त केले.

शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथे अचानक लागलेल्या झोपड्यांच्या आगीत तीन जणांचा आगीत होरपळुन दुर्दैवी मृत्यु झाला होता.तर इतर तिघे जखमी झाले होते.तसेच सणसवाडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होउन घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आले होते.या दोन्ही घटनेत पिडितांचे संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाल्याने दोन्ही कुटुंबे  उघड्यावर आले होते.

सामाजिक जाणिवेचे भान ठेवुन शिवसेनेचे माजी शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ व मिञ परिवाराच्या वतीने गृहोपयोगी किराणा साहित्य सणसवाडी च्या दरेकर व आमदाबाद येथील पिडित कुटुंबाला देण्यात आला.यावेळी ओंकार बिरदवडे,सौरभ वाव्हळ,स्वप्निल वाव्हळ आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या