आंबळेचे सरपंच सोमनाथ बेंद्रे यांचे पद 'म्हणून' रद्द

आंबळे, ता. ५ मे २०१९ (प्रतिनीधी) : निवडणूकीच्या खर्चाचा हिशोब निर्धारित केलेल्या वेळेत व रित मध्ये सादर न केल्याने आंबळेचे सरपंच सोमनाथ बेंद्रे यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी पुणे  रद्द ठरविले असल्याची माहिती महेश बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात माहिती देताना महेश बेंद्रे म्हणाले की संप्टेंबर २०१८ मध्ये आंबळे ग्रामपंचायतीची व सरपंच पदाची निवडणूक झाली होती या निवडणूकीत सरपंच म्हणून सोमनाथ बेंद्रे विजयी झाले तर महेश बेंद्रे हे पराभूत झाले होते.निवडणूकी नंतर महेश बेंद्रे व तपन बेंद्रे यांनी माहिती आधिकार अंतर्गत, सोमनाथ बेंद्रे यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर केला किंवा कसे याबाबत माहिती विचारली होती. याची माहिती मिळाल्यावर महेश बेंद्रे यांनी ग्रामपंचायत १९५८ चा कलम १४ ब अन्वये जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सोमनाथ बेंद्रे यांच्या विरोधात अपिल दाखल केले होते. या अपिलाच्या बाबत २ मे  २०१९ ला निर्णय देण्यात आला.सरपंच बेंद्रे यांनी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या १५ ऑक्टोबर २०१६ नुसार खर्चाच्या हिशोब निर्धारित केलेल्या वेळेत व रीत सादर न केल्याने त्यांचे सरपंच पद अनर्ह  ठरविण्यात आल्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे महेश बेंद्रे यांनी सांगितले.तसेच सोमनाथ बेंद्रे यांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य साठी अपात्र ठरविले असल्याचे ही महेश बेंद्रे यांनी सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालय यांचे एल आर रामगौडा इतर विरुध्द टी एम चंद्रशेखर  सिव्हील याचिका क्रमांक ४२७२/ 1991चा निकालाप्रमाणे उमेदवाराने वेळे व रीत न पाळल्यास अथवा मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास उमेदवारास अनर्ह करण्याची कारवाई केली जाते असे सांगून महेश बेंद्रे यांनी सांगितले की सोमनाथ बेंद्रे यांनी ५० हजार रु खर्चाची मर्यादा असताना ७२६३२ र खर्च निवडणूक निर्णय आधिकारी याच्या कडे जमा केला खर्चाची वेळ व रीत न पाळल्यामुळे सरपंच बेंद्रे यांचे पद रद्द ठरविण्यात आले असल्याची माहिती महेश बेंद्रे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या