रांजणगाव सांडस ते शिवाजीनगर बससेवा सुरु

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorरांजणगाव सांडस, ता.६ मे २०१९ (तुकाराम पठारे) : रांजणगाव सांडस ते शिवाजीनगर बससेवा सुरु करण्यात आली असुन गावात एसटी येताच ग्रामस्थांनी एसटीचे स्वागत करुन चालक-वाहकांचा सत्कार केला.

रांजणगाव सांडस हे गाव शिरूर तालुक्याचे अंतिम टोक. भीमा नदीच्या प्रवाहामुळे शिरूर व दौंड तालुका अशी हद्द पडल्यामुळे दौंड तालुक्यातील वाळकी पिराचीवाडी याठिकाणी शिवाजीनगर ते वाळकी पिराचीवाडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा अनेक वर्षापासून सुरू करण्यात आलेली होती.परंतु रांजणगाव सांडस हे गाव शिरूर सातारा मुख्य रस्त्यापासून दोन अडीच किलोमीटर आत मध्ये असल्यामुळे याठिकाणी कोणतीही बस सेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. सकाळी शिरूर बस गेली की पुन्हा सायंकाळी तीच एसटी रांजणगाव सांडस मुक्कामी येत असे.

रांजणगाव सांडस ते केडगाव हे पंधरा किमी अंतर म्हणजे शिरूर सातारा रस्त्यावर दोन अडीच किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते. त्या ठिकाणाहून खाजगी वाहने व इतर वाहने त्यामध्ये प्रवास करून केडगाव या ठिकाणी रेल्वे स्टेशनला नागरिकांना जावे लागत होते.परंतु एसटी बससेवा सुरु केल्याने नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे.ही गाडी शिवाजीनगर वरुन  4.45 मिनिटांनी सायंकाळी सुटेल व रांजणगाव सांडस होऊन शिवाजीनगर ला जाण्यासाठी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.ही बससेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न शिवाजीनगर डेपो चे अधिकारी वैशाली तांबे व विक्रम शितोळे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी गावातून प्रस्थान झालेल्या बससेवेचे वाहन चालक व कंडक्टर यांचा फेटा बांधून व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण निंबाळकर,हुसेन शेख,महादेव शिंदे, महेश लवांडे ,उमेश गायकवाड ,हरिभाऊ भंडलकर, लक्ष्मण मोरे ,अण्णा घोलप आधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या