विठ्ठलवाडीच्या आखाड्यात २६० मल्लांची हजेरी

Image may contain: 10 people, people smiling, people standing, outdoor and natureविठ्ठलवाडी,ता.७ मे २०१९(प्रतिनीधी) : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे ग्रामदैवत श्री धोंडबाबा देवाची यात्रा उत्साहात  संपन्न झाली. यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात २६० मल्लांनी हजेरी लावली होती.              

विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे दोन दिवसीय यात्रेनिमित्त ‘श्रीं' ची महापूजा व अभिषेक करण्यात आला .' श्रीं ' च्या पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखीचा मान दोरगे कुटुंबीयांकडे होता. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पंडीत हरिश्चंद्र गवारे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री आमन तांबे यांचा लोकनाट्य तमाशा व ऑर्केस्ट्रा 'ही शान महाराष्ट्राची' हे मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. कुस्ती आखाड्यामध्ये पुणे, सोलापूर , अहमदनगर, मुंबई, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नामवंत मल्ल व वस्तादांनी हजेरी लावली . १०० रुपयांपासून ते ११ हजार रुपयांपर्यंत रोख बक्षिसे देऊन मल्लांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने मल्लांना एकूण रोख ५० हजार रुपये  तसेच  ग्रामस्थांच्यावतीने  एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

अंतिम कुस्ती सौरभ शिंदे (विठ्ठलवाडी) व निखिल कदम (राहू) यांची लावण्यात आली. या वेळी समस्त हिंदू आघाडीचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तिअण्णा गवारे, आरएसएसचे विभागीय संघचालक संभाजी गवारे,उपसरपंच जयेश शिंदे, किसन गवारे, काळूराम गवारे, रायचंद शिंदे, माजी उपसरपंच सोपान गवारे, दिलीप गवारे, बाबाजी गवारे, चंद्रकांत गवारे, लव्हाजी लोखंडे, बापू पवार, रायचंद शिंदे, ज्ञानेश्वर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. शिरूर केसरी अविनाश गवारे, लक्ष्मण गवारे, राजेंद्र शिंदे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी हनुमान तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थानी  परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या