विवाहितेला फसवून आणले; बलात्कारानंतर पळाला...

Image may contain: one or more peopleरांजणगाव गणपती, ता.८ मे २०१९ (प्रतिनीधी) : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणा-या आरोपीस रांजणगाव पोलीसांनी परराज्यांत जाउन शिताफीने अटक केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यातील बडनेरा गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला तिचा नवरा मारहाण करून त्रास देतो, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आरोपी संतोष दिवाकर वानखडे (रा.बडनेरा, अमरावती) याने आपण लग्न करू, तुला त्रास देणार नाही, आपण पुण्याला जाऊन राहू  असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेला दि.25 /5 /2018 रोजी कारेगाव एमआयडीसी परिसरात घेऊन येऊन ढोक सांगवी पाचंगे वस्ती येथे खोली घेतली.

आरोपीने प्रथम त्या ठिकाणी विवाहित महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली असता, तिने नकार दिला. त्यावर आपण लग्न करणार आहोत असे म्हणून तिचे सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवत वारंवार विवाहित महिले सोबत आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जुलै 2018 दरम्यान आरोपी विवाहित महिलेला लग्नाबाबत टाळू लागला व तिला सोडून गेला. पीडित विवाहित महिला हिने तिच्या वडिलांना बोलावून घेऊन ती अमरावती येथे गेली. पीडित विवाहित महिला ही आरोपी पासून गरोदर राहिल्यानंतर तिने त्याला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने लग्नास नकार दिला.

विवाहित पीडित महिला हिला आरोपी पासून फेब्रुवारी  मध्ये मुलगी झाली. त्यानंतर देखील आरोपी हा कल्याण मुंबई येथे कामाला असल्याचे तिला समजल्याने आरोपी संतोष वानखडे याची भेट घेऊन लग्नाबाबत विचारणा करता, आरोपीने पुन्हा तिला नकार दिला. विवाहित पीडित महिला हिने दिनांक 25/4/2019 रोजी बडनेरा पोलीस स्टेशन अमरावती येथे आरोपी संतोष वानखडे याचे विरोधात बलात्कार व फसवणूक अशी फिर्याद नोंदवली, सदरचा प्रकार हा रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने सदरची फिर्याद दि. 27/4/2019 रोजी रांजणगाव पोलीस स्टेशनला वर्ग होऊन दाखल करून पुढील तपास अमोल गोरे यांच्याकडे देण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक मनोज यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे हे करत असताना आरोपी संतोष वानखडे हा बडनेरा येथे आला असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी संतोष वानखडे याला बडनेरा अमरावती येथून रांजणगाव पोलीस पथकाने त्याचे राहत्या घरातून ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस मित्र दीपक दरेकर या पथकाने केली असून बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद कुलकर्णी व त्यांचे स्टाफने या कामगिरीत मोलाचे सहकार्य केले. आरोपी संतोष वानखडे याला शिरूर न्यायलायात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या